चीनच्या विशाल धरणाने दिवस कसा कमी केला?”

पृथ्वीची गुप्त हालचाल

चीनच्या हायटेक इंजिनिअरिंगमुळे मानवाच्या कृतीने निसर्गाच्या क्रियांवर किती परिणाम होऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. नासाच्या (NASA) संशोधनानुसार, चीनच्या थ्री गॉर्जेस डॅममुळे पृथ्वीच्या अक्षावर आणि फिरण्याच्या गतीवर लक्षणीय फरक पडला आहे.

पृथ्वीची चाल का बदलली ?

थ्री गॉर्जेस डॅम हा जगातील सर्वात मोठा हायड्रोपॉवर प्रकल्प आहे. या धरणात अब्जो टन पाणी साठवले जाते. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर द्रव्यमानाचे वितरण (Mass Distribution) बदलले आहे.नासाच्या संशोधकांनी सांगितले की, पाणी एका ठिकाणी साठवल्यामुळे पृथ्वीचा अक्ष सुमारे २ सेंटीमीटरने हलला आहे. याचबरोबर पृथ्वीच्या स्वतःच्या भोवती फिरण्याच्या गतीत किरकोळ बदल झाला आहे.पृथ्वी आता आपल्या अक्षाभोवती थोडा वेगवान फिरत आहे, ज्यामुळे दिवस 0.06 मायक्रोसेकंदाने लहान झाला आहे.संशोधकांनी याची तुलना फिगर स्केटरच्या हालचालीशी केली आहे. जसा एखादा स्केटर आपले हात पसरवून हळू फिरतो आणि हात गुंडाळल्यास वेगाने फिरतो, तसाच परिणाम पृथ्वीच्या द्रव्यमानाच्या बदलांमुळे घडतो.

थ्री गॉर्जेस डॅम – एक अभूतपूर्व प्रकल्प

मानवाच्या कृतीचा निसर्गावर परिणाम

थ्री गॉर्जेस डॅम हा केवळ ऊर्जा निर्मिती किंवा वाहतूक सुलभतेसाठी महत्त्वाचा नाही, तर मानवाच्या कृतीमुळे ग्रहाच्या भौतिक संचरनेवर होणारा परिणाम देखील स्पष्ट करतो.या बदलामुळे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर फारसा फरक जाणवत नसला तरी, पृथ्वीच्या हालचालींवर नक्कीच परिणाम झाला आहे.हा प्रकार मानवाने निसर्गावर केलेल्या प्रभावाचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे.थ्री गॉर्जेस डॅम ही इंजिनिअरिंगची अभूतपूर्व कामगिरी आहे, परंतु निसर्गावर होणारे अप्रत्यक्ष परिणाम दाखवते की मानवाच्या योजनांमुळे ग्रहाच्या नैसर्गिक क्रियांवर फरक पडतो.नासाचे संशोधन हे दर्शवते की मानव आणि निसर्गाची परस्परसंवादात्मक भूमिका किती संवेदनशील आहे.

read also : https://ajinkyabharat.com/ola-dukh-aani-debt-mafisathi-sambhaji-brigadecha-grand-front/

Related News