अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील बल्हाडी गावात मूलभूत नागरी सुविधांचा गंभीर अभाव असून,
गावातील रस्त्यांची दुरवस्था, सांडपाण्याचा निचरा नसल्याने रस्त्यावर घाण पाणी वाहते आहे.
त्यामुळे ठिकठिकाणी चिखल आणि डबक्यांमुळे डासांचा उपद्रव वाढला असून,
आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, ग्रामपंचायत चिंचोली गणू
अंतर्गत येणाऱ्या या गावाची लोकसंख्या सुमारे ७०० आहे.
शासनाकडून निधी मिळूनही कोणतीही सुविधा नाही,
याचा संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
लवकर उपाय न झाल्यास १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidhi-shetkayanche-kapashich-pick-uplift/