बाळापूरमध्ये नवे ठाणेदार

अवैध धंद्यांवर लगाम लागेल का ?

बाळापूर  : जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशान्वये सार्वत्रिक बदल्या २०२५ च्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार बाळापूर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारपदावर बदल्या झाल्या आहेत.दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करून त्यांना नियंत्रण कक्ष, अकोला येथे तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यांच्या जागी एमआयडीसी एरिया अकोला येथून आलेले पोलिस निरीक्षक प्रकाश झोंडगे यांनी बाळापूर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी पोलिस स्टेशनच्या कर्मचारी वर्गासह पोलिस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नवीन ठाणेदार रुजू झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि सामाजिक वर्तुळांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. “झोंडगे हे अधिकारी बाळापूरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करतील का?” अशी चर्चा गावात रंगू लागली आहे.

read  also:https://ajinkyabharat.com/karnadharala-dukhpat-last-kshani-badal-honar/