बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई

बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई

अकोला प्रतिनिधी |

बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीचा उरळ पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे.

फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन चांदीच्या अंगठ्या,

Related News

मोबाइल आणि पल्सर दुचाकी असा सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यातील प्रमुख आरोपी चैतन्य दिनेश बोदडे (रा. गुडधी) याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या गुन्ह्यात यश श्रीकांत उमाळे, सोमेश्वर सुभाष लाखे, तसेच तीन अल्पवयीन बालकांचा सहभाग असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी यश उमाळेला पारनेर (ता. अंबड, जि. जालना) येथून अटक केली तर लाखे यालाही ताब्यात घेतले.

या टोळीच्या तिघांकडून एकूण १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल — चोरीस

गेलेली पल्सर दुचाकी, मोबाइल, चांदीच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि दुसरी दुचाकी — जप्त करण्यात आली.

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत असून उरळ पोलिसांच्या त्वरित आणि प्रभावी कारवाईचे कौतुक केले जात आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/picture-city-kolhapurchaya-state-member-padi-nilesh-jamkar-yanchi-appointed-jhalyabaddal-hospitality/

Related News