बड्या नेत्याकडून ‘वंचित’ला आमंत्रण!

अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची

घोषणा होणार आहे. अशातच आता राजकीय घडमोडींना वेग

आला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावं,

Related News

अशी इच्छा केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ आणि स्ट्राँग नेते आहेत. समाजाला

सत्तेत आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या पक्षाला

अद्याप राज्यात मान्यता नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक

विचार करावा. आम्ही एकत्र आलो तर समाजात उत्साह वाढेल.

प्रकाश आंबेडकर महायुती सोबत आले तर सत्तेत वाटा मिळेल.

त्यांनी महायुतीसोबत यावं. वैचारिक मतभेद असले तरी राजकीय

आघाड्या होतात. त्यांचा वंचितचा प्रयोग चांगला आहे. मात्र लोक

त्यांच्या सोबत येत नाहीत. त्यामुळे ते जर महायुतीसोबत आले तर

फायदा होईल, असं रामदार आठवले म्हणाले आहेत.

ऐक्याबद्दल त्यांच्याशी अद्याप चर्चा झाली नाही. मात्र समाज

हितासाठी एकत्र यायला हवं. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात

काम करण्याची माझी तयारी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपाइंचे

अध्यक्ष व्हावं. माझा पाठिंबा त्यांना पाठिंबा आहे. बाबासाहेबांच्या

विचारांचा रिपाइं पक्ष आहे. त्यांची भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे.

मात्र आम्ही एकत्र आलो तर कुणासोबत जायचे याचा निर्णय घेता

येईल. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय इतर गट एकत्र आले तरी

फायदा होणार नाही, असं रामदास आठवले म्हणालेत.

Read also: https://ajinkyabharat.com/relations-between-india-and-canada-deteriorated/

Related News