उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद!

दरडी

दरडी कोसळल्याच्या घटना

चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील

वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे

Related News

जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशांतील इतर भागांतही पावसाचा जोर

कायम आहे. गेल्या आठवडाभरात रूद्रप्रयागमध्ये भूस्खलन होऊन चार

नेपाळी श्रमिकांचा मृत्यू झाला होता. तर हरिद्वारमध्ये एक जण गंगा नदीत वाहून गेला होता.

मुसळधार पावसाने अनेक नद्या दुधडी भरून वाहत आहेत. पाथरी राऊ नदीचे

पाणी घरांमध्ये घुसल्याने तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते.

पुरामुळे नदीपात्राच्या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

तेहरी जिल्ह्यातील बाणगंगा भागात मुसळधार पावसामुळे काही घरांची पडझड झाली.

राज्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे केदारनाथ, ब्रदीनाथ आणि यमुनोत्री जोडणारे राष्ट्रीय महामार्ग ठप्प होत आहेत.

मुसळधार पावसामुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग बनसजवळ उखडला गेला आहे.

त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पावसामुळे देहराडूनच्या

कोचरी कॉलनीसह अनेक भाग जलमय झाले होते. दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यामध्येही

पावसाचा हाहरकार पहायला मिळत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मुसळधार

पावसामुळे कमीत कमी 19 लोक मृत पावले आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या

विविध भागातून 17,000 हून अधिक लोकांना हलवण्यात आले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/lashkarchaya-talawar-attack-by-terrorists-in-jammu-and-kashmir/

Related News