क्रिकेटरच्या अडचणी वाढल्या :भारताचा माजी स्टार क्रिकेटर शिखर धवन आता मोठ्या अडचणीत आहे.
बेकायदेशीर बेटिंग अँपशी संबंधित मनी लाँड्रिंग
प्रकरणात ईडीने गुरुवारी त्याची तब्बल आठ तास चौकशी केली.
शिखर धवन सकाळी 11 वाजता दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाला
आणि संध्याकाळी 7 वाजता बाहेर आला.
चौकशीदरम्यान, त्याला “13 बेट” या बेकायदेशीर बेटिंग अँपशी त्याचा नेमका संबंध काय,
याबद्दल प्रश्न विचारले गेले.
या अँपवर अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये फसवले गेले आहेत,
तसेच करदेखील चुकवला गेला आहे.
फक्त शिखर धवनच नाही, तर माजी क्रिकेटपटू सुरेश रैना देखील ईडीच्या रडारवर आहेत.
सरकारने काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन गेम कंपन्यांवर मोठा निर्णय घेतला होता,
आता त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटरांची चौकशी सुरु आहे.
तज्ज्ञांचा अंदाज आहे की भारतात ऑनलाइन बेटिंग अँप्सचे सुमारे 22 कोटी वापरकर्ते आहेत आणि
या क्षेत्राची बाजारपेठ 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
अँप्सची मुख्यालये भारताबाहेर असूनही, भारतात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/shahbaz-sharif-american-phone-bharatiwar-punha-charges/