वाचन संकल्प महाराष्ट्र हा उपक्रम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अकोला यांच्या सूचनेनुसार उच्च व तंत्र
शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या बाबा वाचनालय वझेगाव येथे नुकताच विद्यार्थ्यामार्फत हा उपक्रम (दिनांक एक जानेवारी 2025)
ला राबविण्यात आला तरुण पिढी विद्यार्थी यांच्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात एक विशेष
असे महत्त्व आहे की वाचनाने विद्यार्थी खूप मोठा होतो आणि वाचनाचे उपक्रम राबवायला पाहिजेत
त्या पद्धतीने हा उपक्रम वजेगाव येथील वाचनाला राबविण्यात आला तसेच यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज तसेच श्री रामचंद्र महाराज यांना हार अर्पण करून हा
कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमाला गणेश श्रीराम माळी अध्यक्ष यांच्या माध्यमातून
हा कार्यक्रम राबविण्यात आला सचिव योगेश रामेश्वर माळी कोषाध्यक्ष सौ कविताताई गणेश माळी उपाध्यक्ष अशोक
श्रीराम माने सदस्य किशोर किसन माळी तसेच ज्ञानदेव साहेबराव रोठे नागोराव वासुदेव गोळे गणेश परसराम माळी कैलास
वानखडे बाबुराव माळी वझेगाव येथील एक ते चार वर्गापर्यंतचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते
सर्व विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घेतला वाचन कौशल्य कार्यशाळेमध्ये सर्व वाचकांनी व गावातील बऱ्याच
नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव माळी यांनी केले तर आभार अभिषेक माळी यांनी केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/agriculture-school-program-concluded-at-kazi-khel-swaroop-khel/