कारंजा : येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून कारंजा शहरात भव्यपणे नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. उत्सवाच्या तयारीसाठी परिसरातील विविध मंडळांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर, पोहा वेश परिसरातील **आझाद हिंद नवदुर्गा उत्सव मंडळाची आढावा बैठक बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता पलक बेस्ट मावा कुल्फीच्या वरील हॉलमध्ये यशस्वीपणे पार पडली.बैठकीच्या सुरुवातीला माँ दुर्गा व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पवित्र प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नंतर उत्सवाच्या तयारीसाठी मंडळाचे कार्यकर्त्यांनी सविस्तर चर्चा केली. मंडप सजावट, समाजोपयोगी उपक्रम राबविणे, विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यासंदर्भात सर्वानुमते निर्णय घेतले गेले.बैठकीत विशेषतः युवा वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती, ज्यामुळे उत्सवाच्या तयारीला नवा उत्साह व बळ मिळाले. कार्यकर्त्यांनी सांगितले की, यंदा उत्सव अधिक भक्तिमय व सामाजिक दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण व सुव्यवस्थितपणे साजरा करण्यासाठी कटिबद्धतेने काम केले जाईल.आझाद हिंद नवदुर्गा उत्सव मंडळाने समाजात ऐक्य व सामाजिक जबाबदारी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून विविध उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. विशेषतः आजच्या धकाधकीच्या युगात लोकांना धार्मिक तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांत सहभागी करून घेऊन एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.उत्सव समितीने सर्व स्थानिक नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून, आगामी उत्सव सर्वांसाठी आनंदमय व स्मरणीय ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/dinkar-aapotikar-yancha-smritiprityartha-pen-watp/