अवं कुठं? आपल्या पुण्यात; पहिल्यांदाच पुण्यातील बसडेपोत धावली डबलडेकर बस, प्रवाशांनी घेतला उत्साही स्वागत
पुणे: मुंबईतील प्रसिद्ध डबल डेकर बस आता पुण्याच्या रस्त्यावर धावली आहे! राज्यभरात मुंबईची डबल डेकर बस हे आकर्षण मानलं जातं, कारण ऐतिहासिक आणि आधुनिकतेचा अद्भुत संगम असलेली ही बस लोकांच्या मनात कायमची घरं केलेली आहे. आता पुण्यातील कात्रज बस डेपोवर पहिल्यांदाच या डबल डेकर बसची यशस्वी ट्रायल रन पार पडली, आणि पुणेकरांनी तिच्या आकर्षक प्रवासाचा आनंद घेतला.
डबल डेकर बसमध्ये एकूण ८५ प्रवाशांची क्षमता असून, यात ६० सिटींग आणि २५ स्टँडिंग सुविधा आहेत. विशेष म्हणजे ही बस संपूर्णपणे वातानुकूलित असून, पर्यावरणपूरक ई-बसच्या स्वरूपात आहे. त्यामुळे केवळ प्रवास सोयीचा नाही तर पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरणार आहे.
या पहिल्या यशस्वी ट्रायलनंतर पुणे महानगर परिवहन मंडळ (PMPML)च्या ताफ्यात पुढील टप्प्यात एकूण १० डबल डेकर बसेस बसविण्याचे नियोजन आहे. या बसेसना पुण्यातील १० विविध मार्गांवर वापरलं जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुविधाजनक आणि रोमांचक होणार आहे.
Related News
प्रवास करताना नागरिकांनी या नव्या सुविधा उत्साहाने स्वीकारल्या असून, अनेकांनी त्यामधून प्रवास करण्यासाठी उत्सुकता दर्शवली. आगामी १०-१५ दिवसांत पुन्हा एकदा या डबल डेकर बसची ट्रायल रन होणार असून, लवकरच ती पुणेकरांच्या सेवेसाठी मार्गावर धावणार आहे.
डबल डेकर बसमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नवा रंग भरला जाणार असल्याचं प्रशासनाचं मत आहे. हे नविन परिवर्तन पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात नवा आनंद आणि सुविधा घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.