अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा,वादळीवाऱ्यामुळे अतोनात नुकसान

वादळीवाऱ्यामुळे

वृक्ष उलमडून पडले , अनेक घरावरचे टिनपत्र उडाले

खामगांव (पंकज ताठे ) – आज सायंकाळी जिल्ह्यात घाटाखाली चक्रीवादळ सदृश अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली,

Related News

यावेळी वादळीवारा वेगाने वाहत होता, चक्री वादळामुळे मोठ मोठे

झाड उल्मळून पडल्याने विद्युत तारा तुटून पडल्या आहे. तर झाडे

रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली. ग्रामीण भागात अनेक घरावरील टीन

उडून गेल्याची माहिती मिळाली आहे. एक तास या अवकाळी पावसाने अर्ध्या अधिक जिल्ह्यात घातल्याचे चित्र दिसून येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक काळे

कुट्ट ढग भरून आले. जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

मलकापूर, नांदुरा, खामगाव, मेहकर, जळगाव जामोद, शेगाव, संग्रामपूर तालुक्यामध्ये चक्री वादळ

सदृश्य अवकाळी वाऱ्याने धुमाकूळ माजवला, यावेळी खामगाव तालुक्यात मोठे मोठे वृक्ष पडली, शेतातील विद्युत पूल

जमिनीवर पडलेत, अनेक घरावरची टीम पत्रे उडून गेले, तसेच आसलगाव येथे बाजार समितीमधील शेड

उडून गेल्याची माहिती मिळत आहे. शेड वरील टीन उडून गेल्याने ,

व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेले धान्य पावसाच्या पाण्यामुळे ओले झाले आहे.

खामगाव शहरात सुद्धा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान असलेले टॉवर चौकतील घरावरील टीनपत्रे उडाले त्यामुळे नुकसान झाले आहे

. विद्युत तार तुटल्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला.

शेतीची मोठ्या

प्रमाणात नुकसान झाले असून, फळबागांचे नुकसान झाले आहे.

पंचनामा करून नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Read Also

https://ajinkyabharat.com/danger-of-heat-stroke-section-144-imposed-in-the-district-till-may-31/

Related News