मुर्तीजापुर : दर्यापुर-मुर्तीजापुर मार्गावर रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. रसलपुर-पायटांगी फाट्याजवळ भरधाव दुचाकीने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटो चालकासह प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.
दर्यापुर येथून प्रवासी घेऊन येणारा ऑटो क्रमांक एमएच 30 एए 6429 हा मुर्तीजापुरकडे जात असताना, दुचाकी क्रमांक एमएच 27 सीई 5691 ने समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ऑटोचे समोरील बाजूचे भाग अक्षरशः तुटून पडले.
अपघातात ऑटो चालक सुधाकर किसनराव वाकपांजर (वय 64, रा. थिलोरी, ता. दर्यापुर) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासह प्रवासी
प्रभाकर लहुजी वाकपांजर
संगीता प्रभाकर वाकपांजर
संगीता गजानन खंडारे
अनिता अजय सोळंके
हेही जखमी झाले आहेत. सर्वांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
FIR नोंद व पोलिस कारवाई:या अपघाताची तक्रार सुधाकर किसनराव वाकपांजर यांनी पोलिसात दाखल केली आहे. FIR नुसार आरोपी हरीराम रतीराम भिलावेकर (रा. चातवाबोळ, जि. अमरावती) याने भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवत अपघात घडवला.
मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसांनी आरोपीवर कलम 281, 125(A), 324(4) सहकलम 184 मोवाकांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
तपास अधिकारी हवालदार गणेश गावंडे यांनी घटनास्थळी पाहणी करून साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
वाहतूक कोंडी:अपघातानंतर काही काळ दर्यापुर-मुर्तीजापुर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांमुळे ट्रॅफिकचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली.
पोलिसांचे आवाहन:या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना वाहन चालवताना वेगमर्यादा पाळणे, निष्काळजीपणा टाळणे आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे याचे आवाहन केले आहे.
तज्ज्ञांचे मत:स्थानिक तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण भागातील रस्त्यांवर भरधाव वेग, वाहन चालकांचा निष्काळजीपणा आणि अपुरी गस्त यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने दर्यापुर-मुर्तीजापुर रस्त्यावर सतत गस्त घालणे आणि वाहतूक नियंत्रण उपाययोजना राबवणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.
read also :https://ajinkyabharat.com/akotat-rashtriya-ekatatechaya-vyaspeethwar-pushpendra-kulshrestha/
 
	
 
											 
											 
											 
											