ऑटोचालकाने दाखवली खरी ओळख”

"ऑटोत राहिला बटवा… पुढे जे घडलं ते थक्क करणारं!"

आकोट :आजच्या काळात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत असताना अकोलखेड येथील एका ऑटोचालकाने आपल्या इमानदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. आकोट ते अकोलखेड प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध महिला अलका मच्छा कोमटी यांचा बटवा प्रवासादरम्यान ऑटोत राहिला होता. या बटव्यात सुमारे दीड हजार रुपये रोख रक्कम आणि ९० ते ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते.ऑटो चालक श्रीधर चवरे यांना प्रवासी उतरल्यानंतर हा बटवा त्यांच्या ऑटोमध्ये दिसला. आत इतकी मोठी रक्कम आणि सोन्याचे दागिने असूनही त्यांनी प्रामाणिकपणे तो स्वतःजवळ न ठेवता थेट आंबोडा वार्ड क्रमांक दोन येथील अलका मच्छा कोमटी यांच्या घरी जाऊन परत केला.त्यांच्या या प्रामाणिकपणाचे वागणे पाहून परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. नागरिकांनी त्यांच्या इमानदारीचे कौतुक करत समाजात विश्वास व नैतिकता अजूनही जिवंत असल्याचे सांगितले.

READ ALSO : http://ajinkyabharat.com/prashassanachaya-darelakshamue-manbha-donad-marg-jhala-jeevaghena/