भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा तारा ठरत असलेला 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. वय फक्त 14, पण कामगिरी मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची! वैभवने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळताना शतक झळकावलं असून त्याच्या तडाखेबाज फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरशः नामोहरम केलं. त्याच्या बॅटमधून निघालेल्या फटक्यांनी मैदान गाजवलं आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. ही इनिंग इतकी प्रभावी होती की तिने न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्कलमच्या रेकॉर्डची बरोबरी केली. भारताचा हा युवा क्रिकेटपटू सध्या भारत-अंडर 19 संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर 19 टेस्ट सामन्यात शानदार शतक झळकावलं. ऑस्ट्रेलिया ,भारत अंडर 19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर 19 (रेड बॉल टेस्ट) वैभव सूर्यवंशीने फक्त 78 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं, जे अंडर 19 टेस्ट इतिहासातील चौथं सर्वात वेगवान शतक आहे. त्याने आपल्या इनिंगमध्ये एकूण 113 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 षटकार , 9 चौकार झळकावले आणि 131.39 च्या स्ट्राइक रेटने खेळ केला. वैभवने इनिंगच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी सुरू केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याला थोपवण्यासाठी केलेली प्रत्येक योजना निष्फळ ठरली.
37 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केलं.
78 चेंडूत झळकवलं शतक.
Related News
इनिंगमध्ये एकूण 8 सिक्स, ज्यापैकी सतत 6 षटकार मारून त्याने मैदान गाजवलं. या तडाखेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचा बचाव पूर्णपणे कोसळला. ब्रेंडन मॅक्कलम हा जगातील सर्वात वेगवान टेस्ट फलंदाजांपैकी एक. आणि आता त्याच्याच पातळीवर वैभव सूर्यवंशी पोहोचला आहे. मॅक्कलमनंतर वैभव हा दुसरा खेळाडू ठरला आहे ज्याने अंडर 19 टेस्टमध्ये 100 पेक्षा कमी चेंडूत दोन शतकं झळकावली आहेत. ही कामगिरी त्याला विशेष यशाच्या शिखरावर नेते. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक ठोकणं हे कोणत्याही खेळाडूसाठी मोठं यश मानलं जातं. वैभव सूर्यवंशीने याआधी इंग्लंड दौऱ्यात थोडं माफक प्रदर्शन केलं होतं. पण आता ऑस्ट्रेलियात त्याने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. त्याच्या या इनिंगमुळे भारत अंडर 19 संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. क्रिकेट विश्लेषक आणि माजी खेळाडू या इनिंगबद्दल म्हणतात:“14 वर्षांच्या मुलाकडून अशी परिपक्व आणि आक्रमक इनिंग अपेक्षित नव्हती. वैभवमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा दम आहे. तो भविष्यात भारताचा मुख्य फलंदाज ठरू शकतो.” अनेकांनी त्याची तुलना विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या सुरुवातीच्या कामगिरीशी केली आहे. वैभव सूर्यवंशी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही ओळखला जातो, पण रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याचा हा पहिला मोठा कारनामा आहे.
तो आता सर्वांगीण खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करत आहे. यंदाच्या IPL सीजनमध्ये वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून आलेल्या शतकामुळे तो आधीच चर्चेत आला होता. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने आपली छाप उमटवली आहे. IPL मधील कामगिरी आणि आता ऑस्ट्रेलियातील शतक या दोन्हीमुळे तो निवड समितीच्या नजरेत आला आहे. सोशल मीडियावर वैभवचं भरभरून कौतुक होत आहे.फॅन्स म्हणत आहेत “हा भविष्यातला विराट आहे!” “14 वर्षांत असा खेळ? भारताला मिळाला नवा सुपरस्टार!” वय लहान असलं तरी वैभवची मानसिक ताकद आणि परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याची क्षमता जबरदस्त आहे.
त्याने रक्षणात्मक फटके आक्रमक षटकार यांचा समतोल साधत इनिंग उभारली. वैभव सूर्यवंशीचं हे शतक केवळ आकडेवारीतलं यश नाही, तर भारतासाठी आशेचा किरण आहे. 14 वर्षांचा हा तरुण खेळाडू
