नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ बाजारपुरा चा सामाजिक उपक्रम यंदा विशेष आकर्षण

राहुल देशमुख नेतृत्वाखाली मंडळाचा पर्यावरण-जागरूक गणेशोत्सव

अडगाव बु: गणेशोत्सव म्हटले की डी.जे., जल्लोष, धमाल आणि मस्ती यांचा विचार येतो.

मात्र, अडगाव बु येथील नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ बाजारपुरा

 राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक भान ठेवून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.

यंदा मंडळाने हिंदू स्मशानभूमी बस स्टॅंड येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला.

याशिवाय गावाची स्वच्छता, इको-फ्रेंडली गणेश मूर्तींची निर्मिती,

विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वितरण, महिला सक्षमीकरण कार्यक्रम,

खेळ स्पर्धा आणि प्रदूषण मुक्त आनंददायी शोभायात्रा असे अनेक सामाजिक उपक्रम यंदाही राबविले गेले.

या प्रसंगी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड,

पोलीस इन्स्पेक्टर श्रीराम जाधव, माजी सभापती गोपाल कोल्हे,

पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल पवार तसेच सामाजिक युवा कार्यकर्ते रितेश देशमुख,

प्रशांत बाहकर, मंडळाचे प्रमुख राहुल देशमुख, प्रफुल देशमुख, विशाल देशमुख ठेकेदार, अनुप देशमुख,

स्वप्निल कोल्हे, कैलास काळपांडे, सुनील सोळंके, अविनाश नेवारे, गणेश डाबेराव, सागर कोहरे,

किसना डाबेराव, अभिषेक अंभोरे आणि रोशन डीगे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ बाजारपुरा या उपक्रमाद्वारे केवळ उत्सव नाही

तर सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण जागरूकतेला प्रोत्साहन देत आहे, अशी स्तुती उपस्थितांनी केली.

Read also :https://ajinkyabharat.com/ganeshotswasathi-security-rules-jaheer-administration-police/