मुंबई | राज्यात जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी ऑगस्ट
आणि सप्टेंबरमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागांत पुढील दोन
महिन्यांत सरासरीइतका किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनीही सोशल मीडियावरून याबाबत माहिती देताना,
“देशाच्या पूर्वोत्तर, पूर्व भारताच्या काही भागांत, मध्य भारतातील काही विभागांमध्ये आणि
दक्षिणेकडील नैऋत्य भागांत पाऊस थोडासा कमी राहू शकतो,” असं सांगितलं आहे.
दरम्यान, सागरी वाऱ्यांची दिशा आणि वेग अनुकूल राहिल्यास गणेशोत्सव आणि नवरात्रात पावसाचा मोठा प्रभाव राहण्याची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीसाठी किंवा प्रवासासाठी
नियोजन करताना हवामान लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/england-ankhi-ek-motha-jhaka-khris-vox-dukhpatimue-samanyabaher/