आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु

आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु

अकोला :

विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून

अलायन्स एअर कंपनीची “मुंबई-अमरावती-मुंबई” विमानसेवा आता सुरू झाली आहे.

Related News

या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोयीचा आणि आरामदायक होणार आहे.

विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबईहून अमरावतीकडे प्रस्थान : दुपारी २.३० वाजता

  • अमरावतीत आगमन : दुपारी ४.१५ वाजता

  • अमरावतीहून मुंबईकडे प्रस्थान : दुपारी ४.४० वाजता

  • मुंबईत आगमन : सायंकाळी ६.२५ वाजता

सुरुवातीला ही सेवा आठवड्यातून तीन दिवस – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार चालवली जाणार आहे.

पुढील टप्प्यात सेवा दिवसांची संख्या वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

या विमानसेवेचे शुभारंभामुळे अमरावतीसह पश्चिम विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

व्यवसायिक, शासकीय अधिकारी, विद्यार्थी व पर्यटक यांना याचा विशेष लाभ होणार आहे.

Related News