‘आट्टम’ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार; मराठीत ‘वाळवी’ची मोहोर

70 व्या

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. 

आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्ल्याळी चित्रपट

‘आट्टम’ने आपली छाप सोडली आहे. आट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट

Related News

चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

त्याशिवाय मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला.

त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित ‘वारसा’ या मराठी चित्रपटाला

सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार, सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील

गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला  आहे.

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये  ‘कंतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी

याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुुरस्कार जाहीर करण्यात आला.

‘कार्तिकेय’ 2 चित्रपटाला  सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

‘पोनियिन सेल्वन 1’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

‘KGF Chapter 2’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘केजीएफ चॅप्टर 2’ ला सर्वोत्कृष्ट

स्टंट कोरिओग्राफीचा पुरस्कारही मिळाला. मनोज बाजपेयी यांना ‘गुलमोहर’साठी

स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला. संजय सलील चौधरी यांना कढीकन

चित्रपटातील संगीतासाठी विशेष पुरस्कार मिळाला.

Read also: https://ajinkyabharat.com/aap-workers-celebrate-arvind-kejriwals-birthday-outside-jail/

Related News