ATM शुल्कात वाढ

ATM शुल्कात वाढ: 1 मेपासून एटीएममधून पैसे काढणे होणार महाग

मुंबई | 28 एप्रिल 2025

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढण्याच्या

शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे वारंवार एटीएम वापरणाऱ्यांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे.

Related News

किती लागणार शुल्क?

सध्या मोफत व्यवहार मर्यादेनंतर प्रत्येक एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी ₹21 शुल्क लागते.

मात्र 1 मेपासून हे शुल्क ₹23 प्रति व्यवहार इतके होणार आहे.

म्हणजेच, मोफत व्यवहाराच्या मर्यादेपलीकडे गेल्यावर प्रत्येक वेळी ₹2 जास्त मोजावे लागतील.

मोफत व्यवहार मर्यादा जैसे थे

  • स्वतःच्या बँकेच्या एटीएमवर: दरमहा 5 मोफत व्यवहार

  • इतर बँकांच्या एटीएमवर:

    • मेट्रो शहरांमध्ये – 3 मोफत व्यवहार

    • नॉन-मेट्रो शहरांमध्ये – 5 मोफत व्यवहार

ही मोफत व्यवहार मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.

जास्त परिणाम कोणावर?

विशेषतः लहान बँकांच्या ग्राहकांना याचा अधिक फटका बसणार आहे.

कारण या बँकांचे स्वतःचे एटीएम मर्यादित असतात आणि ग्राहकांना वारंवार इतर बँकांचे एटीएम वापरावे लागतात.

त्यामुळे फ्री ट्रान्झॅक्शन मर्यादा लवकर संपते आणि शुल्क लागण्याची शक्यता वाढते.

शुल्कवाढीमागील कारण

बँका आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर्सचा (White Label ATM Providers) असा दावा आहे

की एटीएम व्यवस्थापनाचा खर्च वाढला असून, ते तोटा सहन करत आहेत.

त्यामुळे NPCI च्या शिफारशीनुसार RBI ने ही शुल्कवाढ मान्य केली आहे.

अतिरीक्त शुल्क कसे टाळावे?

  1. मोफत व्यवहार मर्यादेतच पैसे काढा

  2. शक्यतो स्वतःच्या बँकेचे एटीएम वापरा

  3. UPI, डिजिटल पेमेंट्स, मोबाईल वॉलेट्स यांचा अधिक वापर करा

  4. एकदाच जास्त रक्कम काढा, वारंवार काढणे टाळा

Read Also : https://ajinkyabharat.com/east-vidarbha-garpeet-aani-avakali-pavasacha-tadakha/

Related News