अटल सेतूवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेला कॅब चालकाकडून जीवनदान

अटल सेतू

अटल सेतू वर काल एका 56 वर्षीय महिलेने आत्महत्येचा

प्रयत्न केला. ही महिला कॅबने पूलावर आली होती.

मध्येच तिने गाडी थांबवून आत्महत्या करण्यासाठी पूलावरून उडी मारली.

Related News

मात्र यावेळी कॅब चालकाने या महिलेची माहिती पोलिसांना दिली

आणि तातडीने ते आले. यावेळी पोलिसांचं प्रसंगावधान आणि

कॅब चालकाची समयसूचकता यांनी महिलेला वाचवण्यात यश आले.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत असून

या कॅब चालकाचं नेटकर्‍यांकडून कौतुक होत आहे.

अटल सेतूवरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला न्हावा शेवा

वाहतूक पोलीस कर्मचारी आणि कॅब चालकानं वाचवलं. संबधित घटना

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. रिमा पटेल (वय-५६) असं संबंधित महिलेचं नाव आहे.

त्यांनी मुलुंड येथून कॅब बुक केली आणि त्या कॅबमधून सेतू येथे आल्या होत्या.

त्यांनी चालकाला कॅब थांबवण्यासाठी सांगितलं आणि कॅबमधून उतरून

त्या अटल सेतूच्या रेलिंगवर चढल्या. त्याचवेळी न्हावा शेवा वाहतुक पोलिसांची

पेट्रोलिंग व्हॅन अटल सेतूवर गस्त घालत होती.

वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण म्हात्रे, यश सोनवणे,

मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले,” असं न्हावा शेवा

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुलफरोज मुजावर यांनी सांगितलं.

Read also: https://ajinkyabharat.com/aditya-thackeray-his-boss-does-not-allow-him-to-contest-maharashtra-elections/

Related News