विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सासरे अजित पवारांची साथ सोडणार

अजितदादांना शरद पवारांकडून पुन्हा एक धक्का

राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि महायुतीमधील भाजप नेते

राहुल नार्वेकर यांचे सासरे माजी सभापती रामराजे नाईक

Related News

निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराज आहेत. श्रीमंत

रामराजे नाईक निंबाळकर फलटणमधून विधानसभेसाठी इच्छूक

होते. परंतु अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवार जाहीर

केली. त्यामुळे नाराज झालेले रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीच्या

शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. रामराजे नाईक हे राष्ट्रवादी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2015 ते 2016 आणि 2016 ते 7

जुलै 2022 या कालावधीत ते विधान परिषदेचे 13 अध्यक्ष होते.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद

पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते

फलटणमध्ये लवकरच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार

आहे. त्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. काही

दिवसांपूर्वी सोळशी येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी रामराजे

यांचे भाषण सुरु असताना विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची

उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर

कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील वाटचालीचा निर्णय घेणार

आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक

निंबाळकर यांच्याबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती.

त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना रामराजे म्हणाले होते,

रणजितसिंह यांचे कार्यकर्ते दहशत निर्माण करत आहेत. त्यांच्या

त्या दहशतीला पाठिंबा देऊ नये, हीच आपली अपेक्षा आहे.

याबाबत सांगून पाहू. फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी

वाजवण्यास फार वेळ लागणार नाही?, असे रामराजे नाईक

निंबाळकर यांनी म्हटले होते. त्यामुळे तेव्हापासून रामराजे शरद

पवार गटात जाण्याची मानसीकता करत होते. रामराजे अजित

पवार यांची साथ सोडून शरद पवार गटात गेल्यास अजितदादांना

तो मोठा धक्का असणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/facebook-ceo-mark-zuckerberg-is-the-second-richest-person-in-the-world/

Related News