आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना लवकरच होणार आहे. हा सामना पहलगाम हल्ल्यानंतर होणारा पहिला हायव्होटेज सामना असून देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, मल्टी नेशन स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा लागेल. सरकारनेही यासाठी परवानगी दिली आहे.या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू आर अश्विनने टीम इंडियाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. युएई विरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळालेली नाही, यामुळे आश्विनने टीका केली.त्याने सांगितले की, “अर्शदीप सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. टी20 मधील सर्वोत्तम गोलंदाजाला खेळण्याचा हक्क आहे. फलंदाज नसल्यामुळे बाहेर बसवणे चुकीचे आहे.”आर अश्विनच्या या टीकेने प्लेइंग 11 निवडीवर चर्चेला चालना मिळाली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/npd-mahanje-kya-ha-ahe-azar/