कोलंबो :आशिया कप 2025 पूर्वी श्रीलंका संघ झिंबाब्वे दौऱ्यावर आहे.
एकदिवसीय मालिकेनंतर होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेसाठी
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या मालिकेतही मोहम्मद शिराजच्या पदरी निराशा आली असून त्याला संधी देण्यात आलेली नाही.
श्रीलंकेच्या नेतृत्वाची धुरा चरिथ असलंका याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
तो एकदिवसीय आणि टी 20i या दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरून अधिकृत घोषणा केली.
मोहम्मद शिराजची पुन्हा निराशा
एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघातही शिराजला वगळण्यात आले होते.
तसेच आता निवड समितीने टी 20i मालिकेसाठीही त्याचा विचार
न केल्याने त्याला आणखी काही आठवडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.
झिंबाब्वे विरुद्धची मालिका
झिंबाब्वे आणि श्रीलंका यांच्यात 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान
दोन एकदिवसीय सामने होणार आहेत.
त्यानंतर 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची टी 20i मालिका खेळवली जाणार आहे.
टी 20i सामन्यांचे वेळापत्रक
पहिला सामना – 3 सप्टेंबर, हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा सामना – 6 सप्टेंबर, हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा सामना – 7 सप्टेंबर, हरारे स्पोर्ट्स क्लब
झिंबाब्वे विरुद्धच्या T20i मालिकेसाठी श्रीलंका संघ :
चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडीस, कुसल परेरा, नाविंदु फर्नांडो,
कामेंदु मेंडीस, कामिल मिसारा, विशेल हलमबागे, दासुन शनाका,
दुनिथ वेलालगे, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, दुष्मंता हेमंथा,
दुष्मंता चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुआन तुषारा, मथीशा पथिराना.
read also:https://ajinkyabharat.com/pistachio-khanan-tharel-arogyasathi-boon/