आशिया कप 2025 टी-20 स्पर्धेसाठी भारतीय संघ 4 सप्टेंबर रोजी दुबईला दाखल झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पूल ए मध्ये खेळणार असून, त्यात पाकिस्तान, यूएई आणि ओमान या संघांचाही समावेश आहे.
भारतातील पहिला सामना
भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध दुबईत खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारताने आतापर्यंत 9 टी-20 सामने खेळले असून, त्यात 5 विजय आणि 4 पराभव अशी बरोबरीची कामगिरी आहे.
सामन्याची वेळ
यूएईमधील उष्णतेमुळे आयोजक समितीने वेळेत बदल केला आहे.
टॉस – संध्याकाळी 7:30 वा.
सामना सुरू – रात्री 8:00 वा. (भारतीय वेळेनुसार)
कुठे पाहणार सामना ?
टीव्ही प्रसारण – Sony Ten 1 आणि Sony Ten 3
ऑनलाइन स्ट्रीमिंग – SonyLiv अॅपवर थेट उपलब्ध
आशिया कपची ही मोहीम टीम इंडियासाठी पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/soybean-pikawar-rogancha-shatkari-crisis/