अशोक वटीकेत विजयस्तंभाला मानवंदना, विविध कार्यक्रमांचे आयोजन

अशोक वटीकेत विजयस्तंभाला मानवंदना, विविध कार्यक्रमांचे आयोजन

भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील

अशोक वटीकेत उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह

स्थानिक नागरिक आणि भीम अनुयायांनी मानवंदना दिली.

Related News

या प्रसंगी मोठ्या उत्साहात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अशोक वटीकेत आयोजित या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली.

यावेळी बुद्ध वंदना, संविधान वाचन, आणि शौर्य गीते यांसारख्या कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले.

विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून, भीम अनुयायांनी वीर शिलेदारांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमादरम्यान बौद्ध विचारसरणीवर आधारित भाषणे, शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन, आणि सामूहिक भोजन

यांसारख्या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला.

अनेक स्थानिक कलाकारांनी गीत-संगीत व नृत्य सादर करून कार्यक्रमाला चार चांद लावले.
या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली.

त्यांनी बौद्ध समाजाला मिळालेल्या प्रेरणादायी वारशाचे महत्व अधोरेखित केले

आणि सामाजिक समतेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
अशोक वटीकेत उभारलेला विजयस्तंभ हा भीमा कोरेगावला जाऊ न शकणाऱ्या अनुयायांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

बौद्ध संघर्ष समितीने या स्तंभाच्या उभारणीसाठी घेतलेला पुढाकार समाजासाठी अभिमानास्पद ठरला आहे.
कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थितांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि

भीमा कोरेगावच्या वीरांना मानवंदना दिली आणि नव्या वर्षासाठी सामाजिक एकतेचे संकल्प घेतले.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/reading-sankalp-maharashtracha-or-undertaking-shankarlal-khandelwal-mahavidyalaya-inauguration-completed/

Related News