आस्की किड्स च्या विद्यार्थ्यांची भारत स्काऊट-गाईड राज्य पुरस्काराला गवसणी

आस्की किड्स च्या विद्यार्थ्यांची भारत स्काऊट-गाईड राज्य पुरस्काराला गवसणी

अकोट

शिस्त आणि नियमन हे ब्रीद घेऊन समाज जागरूकते सोबतच आदर्श नागरिक घडवण्याचे

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भारत स्काऊट-गाईडचे राज्य पुरस्कार चाचणी शिबिर गोरेगाव खुर्द येथे पार पडले.

ज्यामध्ये राज्य पुरस्कार निमित्ताने सहभागी विद्यार्थ्यांच्या एकूण ३० चाचण्या घेण्यात आल्या.

Related News

सदर चाचण्या कौशल्यपूर्ण पद्धतीने सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाम निर्देशन राज्य पुरस्कारासाठी करण्यात येते.

सदर शिबिरामध्ये तालुक्यातील आस्की किड्स पब्लीक स्कूल अकोटच्या कु.दिशा भिरडे,गार्गी भिरडे,विधी सावरकर,श्रावणी अंबळकर,अनुश्री डिक्कर

आणि आदिती रंदे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. लागू करण्यात आलेल्या सर्व

चाचण्या ह्या विद्यार्थ्यांनी सफलरित्या पूर्ण केल्या.ज्यासाठी सर्व मुलींची भारत स्काऊट-गाईड राज्य

पुरस्कार साठी निवड झाली आहे.सदर मुलींच्या स्काऊट-गाईड प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी शाळेचे

अध्यक्ष मिलिंद झाडे,सचिव नितीन झाडे,मुख्याध्यापिका नेहा झाडे,यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या

गाईड विभागाच्या अरुणा काळे आणि प्रशांत रंदे सर यांनी मेहनत घेतली.

सदर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व राज्य पुरस्कार पात्र विद्यार्थ्यांचे शाळेचे पर्यवेक्षक

पवन चितोडे यांच्यासह सर्व शिक्षक वर्गाने शुभेच्छा देत अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या ह्या अलौकिक कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/telhara-shahrache-aradhyadivat-shri-gautameshwar-temple-ancient-tradition/

Related News