आर्यनची केस लढण्यास दिग्गज वकिलाचा नकार;

किंग खानकडून प्रायव्हेट जेट ऑफर आणि पुढे काय घडलं?

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी अडकला होता तेव्हा देशभरात त्याची जोरदार चर्चा झाली होती. जवळपास एक महिना तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामिन मंजूर झाला. या संपूर्ण प्रकरणादरम्यान शाहरुख खानने मुलाला सोडवण्यासाठी मोठमोठे प्रयत्न केले. त्यावेळी माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्याशी शाहरुखने संपर्क साधला होता.

मुकुल रोहतगी यांचा खुलासा

एका मुलाखतीत रोहतगी यांनी सांगितले की,

तेव्हा ते इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होते.

त्यांना शाहरुख खानच्या जवळच्या व्यक्तीकडून फोन आला.

सुरुवातीला त्यांनी सुट्ट्यांमुळे केस लढण्यास नकार दिला.

मात्र शाहरुख खानने स्वतः संपर्क साधत भावुक होऊन विनंती केली.

इतकंच नाही तर शाहरुखने त्यांच्याशी त्यांच्या पत्नीमार्फतही बोलणी केली.

रोहतगी म्हणाले, “शाहरुख खूप विनम्र होता. त्याने मला प्रायव्हेट जेटने बोलावण्याची ऑफर केली. पण मी लहान जेट्समध्ये प्रवास करत नाही म्हणून ती ऑफर नाकारली. शेवटी मी मुंबईत आलो, शाहरुखसोबत हॉटेलमध्ये थांबलो आणि कोर्टात केस लढवली. आर्यनला जामिन मिळाल्यानंतर मी पुन्हा इंग्लंडला परतलो.”

संकटातून बाहेर पडले खान कुटुंब

आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख आणि गौरी खान मोठ्या संकटात सापडले होते. मात्र वेळेनुसार परिस्थिती सुरळीत झाली. सध्या आर्यन खान दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन त्याने केले आहे.

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ची झलक

या सीरिजमध्ये लक्ष्य ललवानी, राघव जुयाल, बॉबी देओल, सहर बंबा मुख्य भूमिकेत आहेत.

बॉलिवूडची वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न आर्यनने यात केला आहे.

विशेष म्हणजे करण जोहर, शाहरुख खान, रणवीर सिंग, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी कॅमिओमध्ये झळकणार आहेत.

read also :https://ajinkyabharat.com/tanushree-dattakdoon-bollywood-mafiavar-dhakkadayak-allegations/