आर्यवैश्य उपवर–वधू परिचय मेळावा

आर्यवैश्य

दिग्रस येथे राज्यस्तरीय आर्यवैश्य उपवर–वधू परिचय मेळावा
२५ व २६ ऑक्टोबरला सर्व सोयीसुविधांसह भव्य आयोजन. ऑनलाईन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिग्रस : आर्यवैश्य समाज, दिग्रस तर्फे “स्वप्नपूर्ती सप्तपदीची साथ, विश्वासाची वाट, आनंदाची” हा भव्य राज्यस्तरीय उपवर–वधू हायटेक परिचय मेळावा शनिवार २५ व रविवार २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दिग्रस येथील अंबिका जिनींग, मानोरा रोडवरील सर्वात आधुनिक व सुसज्ज वासवी मंडपम येथे होत आहे.मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ झाला असून समाजबांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी त्वरित www.avsdigras.com या संकेतस्थळावर नोंदणी करून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सचिन बनगीनवार व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.या मेळाव्याची वैशिष्ट्ये म्हणजे – विदर्भ–मराठवाड्यात मोठ्या प्रमाणत असलेल्या आर्यवैश्य समाजाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस ची ३५ वर्षांची यशस्वी व गौरवशाली परंपरा असून महाराष्ट्रातील सर्वाधिक विवाह जुळणारा मेळावा म्हणून विशेष ख्याती प्राप्त आहे. ८० हजार स्क्वेअर फुटांचा सर्व सोयीसुविधांसह विशाल वासवी मंडपम, मुबलक पार्किंग, भव्य एलईडी स्क्रीन. रुचकर भोजन व दिवसभर चहापाण्याची व्यवस्था, स्वतंत्र मध्यस्थी मंडळ, कुटुंबीय भेटीसाठी स्वतंत्र विभाग, मेकअप रूम सुविधा. संपूर्ण परिसरात मोफत वाय-फाय (WI-FI). ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सोय. पहिल्या २०० ऑनलाइन नोंदणीकर्त्यांना विशेष ‘राऊंड टेबल’ आरक्षित, तसेच स्मरणिका, आयकार्ड, डायरी–पेन व फोल्डर मोफत.

नोंदणीसंदर्भातील अडचणी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क :

शशिकांत बोजेवार मो. क्र. 8421659566, अंकुश गट्टावार – 9175749250, सुधीर गोविंदवार – 8485848580, गजानन तुंडलवार – 9422129990.

सचिन लक्ष्मणराव बनगीनवार अध्यक्ष, आर्यवैश्य समाज दिग्रस –जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे विवाह : दोन हृदयांचे, दोन विचारांचे व दोन कुटुंबांचे पवित्र बंध या सोहळ्याने घट्ट विणले जातात. विश्वास, संस्कार आणि संस्कृतीची परंपरा यातून जपली जाते. आजच्या धकाधकीच्या काळात योग्य जोडीदार शोधणे हे आव्हानात्मक बनले आहे. वेळ, श्रम व आर्थिक साधनांचा मोठा अपव्यय टाळून एकाच छताखाली समाजातील उपवर–उपवधूंचा परिचय घडवून देणे ही खरी सामाजिक सेवा आहे. हा मेळावा केवळ विवाह जुळविण्याचे व्यासपीठ नाही, तर समाजातील ऐक्य, आपुलकी व परंपरेचे जतन करणारा उत्सव आहे. आपल्या भावी जीवनसाथीच्या शोधातील ही सुवर्णसंधी साधा – सचिन लक्ष्मणराव बनगीनवार अध्यक्ष, आर्यवैश्य समाज दिग्रस.
read also : https://ajinkyabharat.com/gavakyanchi-punarvasnachi-vigorous-magani/