अरविंद केजरीवालांचा तुरूंगातला मुक्काम वाढला

दिल्ली

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

हे सध्या तुरुंगात आहे. दरम्यान केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात

जामिनासाठी याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांच्या जामीन

Related News

याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ५ सप्टेंबरपर्यंत पुढील

सुनावणी तहकूब केली आहे. पुढील सुनावणी ५ तारखेला होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयने केलेल्या

अटकेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जामिनाची याचिका दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टात आज केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी पार पडली.

यावेळी सीबीआयने आम्ही पहिले उत्तर दाखल केले आहे, मात्र ते रेकॉर्डवर नाही.

तसेच दुसरे उत्तर सादर करण्यासाठी काही कालावधी हवा आहे,

असे सांगितले. सीबीआयच्या मागणीनंतर न्यायमूर्तीच्या खंडपीठाने

सीबीआयला दोन दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

Read also: https://ajinkyabharat.com/central-government-ready-to-increase-kanda-rate/

Related News