अरुणा इराणींनी का लपवलेलं विवाहित दिग्दर्शकासोबतचं लग्न?

मुंबई– ‘बेटा’, ‘फर्ज’, ‘रॉकी’, ‘बॉबी’ आणि ‘लव्ह स्टोरी’ यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमात काम करणाऱ्या अरुणा इराणी यांनी सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूड गाजवलं आहे. त्या अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. अरुणा आज त्यांचा ७८ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

अरुणा इराणी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. दिग्दर्शक कुकू कोहलीसोबतच्या त्यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा होती. अभिनेत्रीने आपले लग्न बरेच दिवस सर्वांपासून गुप्त ठेवले होते. एका मुलाखतीत अभिनेत्रीने कुकू कोहलीसोबतची प्रेमकहाणी तसेच लग्न लपवण्याचे कारण सांगितले.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत अरुणा यांनी सांगितले की, त्या आणि कुकू कोहली सुरुवातीला एकमेकांचा तिरस्कार करत होते. पण नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

Related News

अरुणा इराणी आणि कुकू कोहली यांची पहिली भेट

अभिनेत्री म्हणाली, ‘कोहराम’ दरम्यान माझी कुकुजींशी भेट झाली होती. घर चालवण्यासाठी मी तेव्हा खूप चित्रपट करत होते. पण त्या फारशा चांगल्या भूमिका नव्हत्या. मी मद्रासमध्ये माझ्या चित्रपटांमध्ये खूप व्यस्त होते. त्यावेळी कुकुजींनी मला माझ्या महिनाभराच्या डेट्स मागितल्या, मी काही दिवस प्रयत्न केले पण जमले नाही म्हणून त्यांना सांगितले की मी चित्रपट करू शकत नाही. त्याचा कुकुजींना राग आला, त्यांना ही कल्पना आवडली नाही. पण आम्ही काम करत राहिलो.

अरुणा इराणी-कुकू कोहली सेटवर भांडत असत

अरुणा इराणी पुढे म्हणाल्या, ‘ माझ्याकडे काम नसले तरी तारखा दिल्या जात होत्या, ते मला फोन करायचे तेव्हा मला खूप राग यायचा.’ कधी-कधी ते मला दिवसभर बसवायचे आणि मग एका सीनचा शॉट घ्यायाचे. त्यामुळे आमची भांडणं व्हायची. मी कुकुजींचा तिरस्कार करत होते आणि त्यांनाही माझा प्रोब्लेम होता. मग काय झाले माहित नाही, ते नरमू लागले आणि आमची मैत्री झाली. मग त्याने माझ्या डेटसू जुळवायला सुरुवात केली. आणि शेवटी आम्ही प्रेमात पडलो.

१९९० मध्ये लग्न झाले

अरुणा इराणी आणि कुकू कोहली यांनी १९९० मध्ये लग्न केले. तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या. जेव्हा कुकू कोहली यांनी अरुणाशी लग्न केले तेव्हा त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. मात्र नंतर हा वाद परस्पर चर्चेतून सोडवण्यात आला.

Related News