माजी नगरसेविका तथा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची कन्या
गीता गवळी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती
मिळत आहे. दक्षिण मुंबईत अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
आहे. त्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत
करण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी
भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचं आश्वासन दिलं
होतं. यानंतर आता गीता गवळी या ठाकरे गटाच्या संपर्कात
असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे सचिव
तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी
चाळीत जाऊन भेट घेतली आहे. गीता गवळी भायखळा
विधानसभा मतदारंसघातून लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती
सूत्रांनी दिली आहे. पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा
निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
मात्र त्यानंतर बदललेल्या गणितावरून गीता गवळी मशालीवर
निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. अरुण गवळी यांनी स्थापन
केलेला अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या नगरसेविका
होत्या. त्याचप्रमाणे आरोग्य समितीच्या अध्यक्षा देखील गीता
गवळी होत्या. सध्या भायखळा विधानसभेत शिंदे गटाच्या आमदार
यामिनी जाधव आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाकडून आणखी
पदाधिकारी देखील इच्छुक आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/adani-group-and-google-signed-a-banana-agreement/