अर्शदीप सिंगवर अश्लील हावभावाचा आरोप”

PCB ने अर्शदीप सिंगवर दाखल केली तक्रार

मुंबई : आशिया कप २०२५ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्याविरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. पीसीबीच्या मते, अर्शदीपने सुपर 4 फेरीत २१ सप्टेंबरला भारत-पाक सामना खेळताना प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले, ज्यामुळे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या कृतीस कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारतीय गोलंदाजाची वर्तणूक खेळात व्यत्यय आणणारी आणि बेजबाबदार असल्याचे पीसीबीने नमूद केले आहे. यापूर्वीही पीसीबीने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती, ज्यावर आयसीसीने ३०% सामना फी दंड ठोठावला होता.अर्शदीप सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीसीबीने आक्षेप घेतला आहे. आता आयसीसीच्या निर्णयानंतरच या आरोपातील सत्यता स्पष्ट होणार आहे.भारताने आतापर्यंत आशिया कपमध्ये पाकिस्तानला दोन वेळा पराभूत केले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंवर दबाव राहणार आहे. जेतेपदासाठी हा सामना महत्त्वाचा असून, दोन्ही संघांच्या आक्रमकतेसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/thakkriti-shivsenechya-volthanant-pvr-pvr/