आरोग्य सेवेत उल्लेखनीय कार्यासाठी संगीता जाधव यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025

अकोल्याच्या कन्येला राष्ट्रीय सन्मान

बार्शीटाकळी- आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्षा, अकोला सौ. संगीता ताई जाधव यांची नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 साठी निवड

झाली आहे.शिक्षक दिनानिमित्त तसेच दैनिक कर्णधार वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येते.

यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्य, आरोग्य सेवा, क्रीडा, राजकीय, कला, सहकार, वकील, डॉक्टर, महिला नेतृत्व आदी क्षेत्रांचा समावेश आहे.

अकोला जिल्ह्यातील पातुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत असलेल्या सौ. संगीता जाधव यांनी आरोग्य सेवेत विशेष योगदान दिल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

येत्या 11 सप्टेंबर 2025 रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये होणाऱ्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Read also :  https://ajinkyabharat.com/devvives-shankar-sansthan-poa-utsav-excellent-baljodin-rokh-puriting/