अकोट : श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दर्यापूर रोड, अकोट येथे सुरू असलेल्या नवदुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर “जागर नारी शक्तीचा” हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. भाग्यश्री वानखडे उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे होते. कार्यक्रमाला क.म.वि. पर्यवेक्षक प्रा. संजय पट्टेबहादूर, एच.एस.व्ही.सी. प्रमुख प्रा. अर्चना कुचे, तसेच संगीत विभाग प्रमुख डॉ. प्रतिभा पवित्रकार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली डॉ. भाग्यश्री वानखडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजच्या बदलत्या जीवनशैलीत विशेषतः किशोरवयीन मुला-मुलींनी आरोग्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. सकस आणि संतुलित आहार घेतल्यास शरीराचा आणि मनाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या विचाराचा अंगीकार करणे गरजेचे आहे.” प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “जंक फूडपासून दूर राहा आणि आपल्या आजी-आजोबांनी अवलंबलेल्या पारंपरिक, संतुलित आहार पद्धतीचा स्वीकार करा.” या उपक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशिष वनकर यांनी केले, प्रास्ताविक डॉ. अश्विनी फोकमारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश रहाटे यांनी मानले.
read also: https://ajinkyabharat.com/anil-deshmukhancha-serious-disclosure/
