अरुणाचल प्रदेशमध्ये आर्मी ट्रक दरीत कोसळला

3 सैनिकांचा

3 सैनिकांचा मृत्यू, 4 जखमी

मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात लष्कराचा ट्रक

खोल दरीत पडला. यामध्ये लष्कराचे ३ जवान शहीद झाले असून ४ जण

Related News

जखमी झाले आहेत. हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि

ग्रेनेडियर आशिष अशी मृत जवानांची नावे आहेत. अरुणाचल प्रदेशातील

अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील लिमेकिंगपासून १५ किमी अंतरावर बोरारुपकजवळ

हा अपघात झाला. हा अपघात जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 145 किलोमीटर

अंतरावर झाला. या प्रकरणाबाबत इटानगर पोलिसांनी सांगितले की,

अपघातात तिन्ही जवानांचा जागीच मृत्यू झाला. चार जखमींना रुग्णालयात

दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या ईस्टर्न कमांडनेही जवानांच्या मृत्यूबद्दल

शोक व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना लेफ्टनंट जनरल

आर.  सी.  तिवारी म्हणाले, अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना शूर हवालदार

नखत सिंग, एनके मुकेश कुमार आणि जीडीआर आशिष यांच्या दुःखद निधनाबद्दल

मी मनापासून शोक व्यक्त करतो. भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबियांच्या

पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/bsp-president-mayawatis-unanimous-decision/

Related News