Arjun Tendulkar : साखरपुड्यानंतर अर्जूनला मोठा धक्का; दुलीप ट्रॉफीतून वगळलं!

साखरपुड्यानंतर अर्जूनला मोठा धक्का; दुलीप ट्रॉफीतून वगळलं!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जून तेंडुलकर याला मोठा झटका बसला आहे.काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला.

मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अर्जूनला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

28 ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड यांसारखे भारतीय संघातील स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत.

मात्र अर्जूनला नॉर्थ ईस्ट झोनकडून संधी नाकारण्यात आली.

 अर्जूनने रणजी ट्रॉफीत प्लेट ग्रुपमधील 4 सामन्यांत 16 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 37 विकेट्स आणि 532 धावा आहेत.

तरीदेखील निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.

 दुलीप ट्रॉफीतील पहिला सामना नॉर्थ विरुद्ध ईस्ट झोन असा रंगणार आहे. ही स्पर्धा 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या काळात बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये पार पडणार आहे.

साखरपुड्यानंतर आनंदात असलेल्या अर्जूनला करिअरच्या दृष्टीनं हा निर्णय मोठा धक्का मानला जातो आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/the-high-hearted-shetkyanna-governance-level-madat-mivun-danyasathi/