खासदार अनुप धोत्रे यांनी बुधवारी दैनिक अजिंक्य भारत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासंदर्भात
Related News
विविध विषयांवर संवाद साधला.
यावेळी भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी,
सोशल मिडीया प्रमुख अक्षय जोशी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर अकोल्यात दाखल होताच
सर्वांत आधी अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी करून
प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी
रेल्वे, पोलिस अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली.
अकोल्यात ३५० कोटी निधीतुन मॉडेल रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहे.
या मॉडेल रेल्वे स्टेशनमध्ये केवळ भव्य इमारती न बांधता
प्रवाशांच्या सुविधेसाठी लिफ्ट, पार्किंगची योग्य व्यवस्था आखणे आवश्यक असुन
त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खतांच्या होत असलेल्या समस्येवर
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन
शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे व खतांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले.
रासायनिक खतांच्या पुरवठ्यासंदर्भात रेल्वेकडून रॅक मिळत नसल्याच्या प्रश्नावर
दिल्लीत रेल्वे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून तातडीने उपाययोजना करण्याचे सुचवले.
त्यामुळे आता रॅक उपलब्ध झाल्या आहेत.
शहरातील अकोट फैल भागातील रेल्वे स्टेशनचा पुल खुप जुना झाला असुन
या पुलाचे नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव देऊन
तातडीने बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशभर रेल्वे, नॅशनल हायवेचे जाळे विणत असुन
आगामी काळात नॅशनल हायवेची क्रांती दिसुन येणार असल्याचे खासदार धोत्रे म्हणाले.
अकोल्यात वंदे भारत, तेजस एक्सप्रेस आदी गाड्यांचे थांबे करण्यावर आपला भर आहे.
पश्चिम विदर्भात अकोला हे औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असुन
शेती आधारीत उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आहेत.
तसेच केंद्र शासनाने उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सुटसुटीत केलेल्या धोरणांमुळे
गेल्या तीन-चार वर्षाआंत येथे दोन स्पिनिंग उद्योग सुरू झाले आहेत.
मतदारसंघात उद्योगधंद्यात वाढ आणि त्यातुन रोजगार निर्मितीसाठी
आपण सदैव सकारात्मक असुन केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून
मतदारसंघात औद्योगिक विकासावर आपला भर आहे.
यासोबतच अकोल्याच्या विमानतळाचा प्रश्न तातडीने माग लावण्यासाठी
केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असुन
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी या विषयावर
माझी व आमदार रणधिर सावरकर यांची चर्चा सुद्धा झाल्याचे खासदार धोत्रे म्हणाले.
मी शेतकरी पुत्र!
मी शेतकरी पुत्र असुन शेती आणि शेतकरी
हा आपल्या संपूर्ण कार्यकाळात कायम प्राधान्यक्रम राहणार आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध असुन
मतदारसंघातील शेतकरी, मजुर, कामगार, उद्योजकांसह युवाशक्ती व मातृशक्तींने
जो मतरूपी आपल्यावर विश्वास टाकला तो सार्थकी लावणार असल्याचे आश्वासन
जिल्ह्याचे नवनिर्वाचीत खासदार अनुप धोत्रे यांनी दिले.
अकोल्यात पोलीस आयुक्तालयासाठी प्रयत्न
शहरासह जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी
अकोल्यात पोलिस आयुक्तालयाची नितांत आवश्यकता असून
त्या दृष्टीने राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
आयुक्तालय स्थापन झाल्यावर गुन्हेगारीवर
निश्चितच अंकुश बसणार असल्याचे खासदार धोत्रे म्हणाले.
Read also : नागपूर हादरलं! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट. (ajinkyabharat.com)