9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे.
महायुती सरकारच्या काळातील घोटाळे आणि खोट्या आश्वासनांचा जनतेपुढे
पर्दाफाश करण्याचा उद्देश या यात्रे मागे आहे, अशी माहिती
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेले आहे.
राज्यातील अनेक उद्योक राज्याबाहेर गेले आहे.
मोजक्या उद्योगपचींची भरभराट झाली आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम
हिसकावून घेत आहेत. हे सर्व राज्यकर्ते उघड्या डोळ्यांना पाहत बसले आहेत.
त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे
दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार आहोत. पहिल्या टप्प्यात
दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांतून फिरणार असून
लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे
9 ऑगस्ट या दिवशी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा
क्रांती मैदानातून देण्यात आला होता. त्यासोबत या दिवशी
जागतिक आदिवासी दिवस असल्याने देखील हा निवडल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा
आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला नाकारले.
राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला.
त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय आहे.
परिणामी सरकार वाचवण्यासाठी महायुतीकडून वेगवेगळ्या योजनांचा
भडीमार करण्यात आला आहे.
तसेच सरकारी तिजोरी मोकळी करत आहेत.
असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.
Read also: https://ajinkyabharat.com/jan-sanman-yatrala-good-response-from-people-ajit-pawar/