बच्चू कडूंची शेतकरी आघाडीची घोषणा; जरांगे पाटील यांना खुलं आमंत्रण

राज्यामध्ये

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजणार आहे.

त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले असून मोर्चेबांधणी सुरु आहे.

यंदाची लढाई प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची ठरणार आहे.

Related News

राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर

ही विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे.

त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे.

दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी राज्यामध्ये

नवीन आघाडीची घोषणा केली आहे. निवडणूकीमध्ये तिसरी आघाडी नाही

तर शेतकऱ्यांची आघाडी असणार आहे असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

बच्चू कडू हे सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत महायुतीमध्ये सामील आहे.

मात्र लोकसभेच्या निवडणूकीं आधीपासून त्यांचे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी केलेल्या शेतकरी आघाडीमुळे यंदाची विधानसभा गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बच्चू कडू म्हणाले की, “येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नाही,

तर शेतकऱ्यांची आघाडी असेल.

कष्टकरी, शेतकरी जे जास्त कष्ट करतात त्यांची ही आघाडी असेल.

९ ऑगस्टला संभाजीनगर येथे आम्ही सभा ठेवली आहे.

त्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना शेतकरी आघाडीत यायचं असेल,

तर त्याचं स्वागत आहे. आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच आहे,

असे मत बच्चू कडू यांनी मांडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

प्रहारचे नेते बच्चू कडू हे सध्या महायुतीमध्ये आहेत.

मात्र त्यांचे आघाडीमध्ये खटके उडत आहे.

आपली नाराजी देखील त्यांनी उघडपणे जाहीर देखील केली आहे.

लोकसभेमध्ये अमरावतीच्या जागेवरुन भाजप विरुद्ध बच्चू कडू

अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती.

नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने बच्चू कडू नाराज होते.

त्यामुळे आता आगामी विधानसभेमध्ये महायुतीमधून एक्झिट घेत

नवीन आघाडी स्थापन करण्याचे संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत.

शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि दिव्यांग यांच्या समस्यांवर काही मुद्दे मांडत होतो.

त्यासाठी १० ते १५ आमदार एकत्र आले.

परंतु सत्ताधाऱ्यांकडे यावर चर्चा करण्यासाठी वेळ नाही यावेळी मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात ते पाहून निर्णय घेऊ.

Read also: https://ajinkyabharat.com/the-cut-of-capturing-the-indian-watchtower-was-revealed/

Related News