मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना अडवत केली घोषणाबाजी

मराठा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नेत्याला

घेराव घालत मराठा आरक्षणाची मागणी रेटण्याची मराठा आंदोलकांची

पद्धत आजही कायम राहिली असून धाराशिवच्या परंड्यात आज

Related News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मराठा आंदोलकांनी अडवल्याचे दिसून

आले. धाराशिवच्या हातलाई मंगल कार्यालयात  पक्षमेळाव्यासाठी

मुख्यमंत्री आले असता मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर

घोषणाबाजी केली. राज्यात एकीकडे विधानसभा निवडणूका तर दुसरीकडे

मराठा आरक्षणाचा प्रश्न असा दुहेरी पट मोठा चर्चेचा विषय झाला असून

राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना

अडवण्यापासून सुरु झालेला नेत्यांच्या अडवाअडवीचा ट्रेंड मुख्यमंत्र्यांच्या

धाराशिव दौऱ्यातही पहायला मिळाला. धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेच्या

कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थांबवत मराठा आंदोलकांनी

थांबवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेट

वापरण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून आरक्षणाचा प्रश्न तात्काळ

सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही

मराठा आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्यांचे निवेदन स्विकारले.

Read also: https://ajinkyabharat.com/kolkatas-sn-banerjee-roadwar-explosion/

Related News