अनिल देशमुखांचा गंभीर खुलासा

हा अपघात नव्हे, हल्ला होता!

 फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट – देशमुखांच्या गाडीवर मोठ्या दगडाने हल्ला, काच फुटून कपाळाला दुखापत, देशमुखांचा सरकारवर थेट आरोप

घटनेचा आढावा: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दहा महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवलं आहे. या हल्ल्याबाबत आता देशमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की, त्यांच्या गाडीवर दोन इसमांनी दगडफेक केली. एकाने छोटा दगड तर दुसऱ्याने सुमारे 10 किलो वजनाचा दगड गाडीवर फेकला.  या दगडामुळे गाडीची काच फुटली आणि देशमुखांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली.

अनिल देशमुखांचे आरोप: “ही घटना झाल्यापासून राजकीय रंग दिला गेला. पोलिसांकडून रिपोर्ट न घेता, राजकीय दबावाखाली वक्तव्य करण्यात आलं. फॉरेन्सिक रिपोर्टने हे स्पष्ट केलं आहे की हा हल्लाच होता. दोन माणसांनी दगडफेक केली, त्यांना शोधून कारवाई व्हायला हवी होती,” असं देशमुखांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले,“मी फॉरेन्सिक रिपोर्ट स्वतः पाहिला आहे. मी गृहमंत्री होतो, त्यामुळे मला पोलिस खात्याकडून तो रिपोर्ट मिळाला. आता मी लवकरच हा रिपोर्ट जनतेसमोर मांडणार आहे.”

राजकीय वळण: देशमुखांनी सरकारवर आरोप करत सांगितलं की, घटनेनंतर लगेचच एसपींनी राजकीय दबावाखाली भूमिका घेतली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या घटनेला “सलीम-जावेदची स्टोरी” म्हणत दुर्लक्ष केल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे.

फॉरेन्सिक रिपोर्टचे निष्कर्ष: गाडीवर दोन व्यक्तींनी दगडफेक केली, एक दगड छोटा तर दुसरा सुमारे 10 किलो वजनाचा,गाडीचा वेग कमी होता, दगडामुळे काच फुटली आणि कपाळाला जखम ही अपघात नव्हे, हल्ला असल्याची नोंद अनिल देशमुख यांनी सांगितलं की, “फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू. आरोपी सापडले नाहीत, यासंदर्भात स्वतंत्र रिपोर्ट यायला हवा होता.”

read also:https://ajinkyabharat.com/philippines-hadllel/