अंदमान सागरात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; 

अंदमानच्या खोल समुद्रात सापडला खजिना

भारताला उर्जाक्षेत्रात मोठा लाभ मिळालेला आहे. अंदमान सागरातील खोल समुद्रात नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याने भारताच्या आत्मनिर्भर धोरणाला मोठा बळ मिळणार आहे. पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी शुक्रवारी (27 सप्टेंबर) याची अधिकृत घोषणा केली.माहितीनुसार, अंदमान सागरातील या नैसर्गिक वायूच्या शोधासाठी समुद्रात 2650 मीटर खोदकाम करण्यात आले. त्यात 295 मीटर खोलीवर नैसर्गिक वायूचा साठा आढळला. या शोधासाठी दोन विहिरींचा अभ्यास केला गेला, जे अंदमान सागराच्या किनाऱ्यापासून सुमारे 17 किमी अंतरावर आहेत.हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले की, “या साठ्यात वेळोवेळी आग भडकल्याचे निरीक्षण झाले. नमुन्यांची तपासणी काकिनाडा येथे करण्यात आली, त्यात 87 टक्के मिथेन वायू असल्याचे समोर आले.” ही माहिती भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळे उर्जा क्षेत्रातील स्वायत्तता वाढेल.भारत सध्या परदेशातून नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. 2023-24 साली देशाला 44 टक्के नैसर्गिक वायू परदेशातून आयात करावा लागला होता. अंदमान सागरातील या नव्या साठ्यामुळे परदेशावर अवलंबित्व कमी होईल आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल जलद होईल.या शोधामुळे भारताचा उर्जाक्षेत्रातील बळ वाढण्यास मदत होईल आणि देशातील उद्योग, उत्पादन तसेच घरगुती व औद्योगिक वापरासाठी नैसर्गिक वायूचा पुरवठा सुनिश्चित होणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/ashiya-kapamadhye-sanju-samsanne-dhoni-vikram-modla/