……..अन खाकी आली धावुन

........अन खाकी आली धावुन

लोणार, दि. 28(प्रतिनिधी)

लोणार शहराबाहेरील घरकुल परिसरातील एका डोहात बुडणाऱ्या दीड वर्षी मुलांचे पेट्रोलींग करणारे बिटजमादार व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्राण वाचविले.

लोणार पोलीस स्टेशनचे बिट जमादार संतोष चव्हाण व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकस हे पेट्रोलिंगसाठी घरकुल परिसरात गेले होते.

त्या ठिकाणावरून पेट्रोलिंग करून परत येत असताना त्यांना एका डोहा जवळ एक मुलगा ओरडत असताना दिसून आला.

त्यानंतर डोहात पाहिले असता एक दीड वर्षीय चिमुकला पाण्यात बुडताना दिसून आला.

क्षणाचाही विलंब न करता पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकस यांनी पाण्यात उडी घेऊन त्या बालकाला पाण्यातून बाहेर काढले

व त्यांचा कुटुंबियांच्या स्वाधीन केले.

या कामगिरीमुळे सर्वत्र पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/officers-administration-training-complete-karnayana-300-disaster-mitrana-sahityache-watp/