अमरावती विद्यापीठाच्या चर्चेत विद्यार्थी, प्राध्यापक आणि समाजहिताला गती

विद्यापीठाच्या

अमरावती- डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशन (डाटा) अमरावती

विभागाच्या शिष्टमंडळाने दिनांक २१ ऑगस्ट रोजी संत गाडगेबाबा

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांची

भेट घेऊन विविध शैक्षणिक, प्रशासकीय व विद्यार्थीहिताच्या मागण्या मांडल्या.

यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत कुलगुरूंनी सर्व मागण्यांची

ठोस कार्यवाही करून पूर्तता केली जाईल, असे अभिवचन दिले.

विभागीय सचिव डॉ. एम.आर. इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ

गुरुवारी दुपारी ४ वाजता विद्यापीठात दाखल झाले.

एकूण बारा मागण्यांचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले.

यामध्ये प्रमुख मागण्यांमध्ये –

बंद केलेले राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र व वाणिज्य

हे पदव्युत्तर अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावेत,

शासनाकडून अनुदानासाठी प्रस्ताव पाठवावा,

प्राध्यापक भरती व प्लेसमेंट संदर्भातील अन्याय दूर करावा,

पीएच.डी. फी माफक ठेवावी, बेरोजगार विद्यार्थ्यांना ५० टक्के फी सूट द्यावी,

पीएच.डी. नसलेल्या प्राध्यापकांना पदोन्नती बाबत यूजीसीच्या

६ जून २०२४ च्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी,

बी.कॉम. अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय विचार समाविष्ट करावेत,

पेट परीक्षेच्या मार्कशीटवर जातीऐवजी प्रवर्ग नमूद करावा,

बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. स्तरावर संविधान हा विषय अनिवार्य करावा,

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’

विषय जिल्हा स्तरावर सुरू करण्यासाठी इच्छुक संस्थांना संधी द्यावी,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या बांधकामास प्रारंभ करावा,

विद्यापीठाच्या ए.व्ही. थिएटरला आंबेडकरांचे नाव द्यावे,

विविध समित्यांवर सर्व प्राध्यापकांना संधी मिळावी – अशा मागण्यांचा समावेश आहे.

या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

काही विषयांसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याची सूचना कुलगुरूंनी दिली,

जेणेकरून संबंधित विभागाकडे पाठवून तातडीने कार्यवाही करता येईल.

या चर्चेत प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, डाटा विभागीय अध्यक्षा डॉ. निशा शेंडे,

सहसचिव डॉ. कल्याण साखरकर, सिनेट सदस्य डॉ. संतोष बनसोड, डॉ. रवी जुमडे,

अकोला जिल्हाध्यक्ष डॉ. प्रसन्नजीत गवई, प्रा. बी.एस. इंगळे, डॉ. बी.बी. धारणे,

डॉ. एस.आर. दामोदर, डॉ. कैलास वानखडे, प्रा. दिलीप कुमरे, डॉ. डी.आर. खंडेराव,

डॉ. अशोक मंडकमारे, प्रा. अशोक वानखडे, डॉ. माधुरी धिवरे, डॉ. मनोहर वासनिक,

डॉ. राजेंद्र वाघमारे, प्रा. चंद्रशेखर मेंडोले, डॉ. विष्णु घुमटकर, प्रा. राहुल माहुरे,

डॉ. भास्कर पाढेण, डॉ. आर.एन. कुऱ्हाडे, डॉ. एस.एन. खाडे, डॉ. रोहित वनकर,

डॉ. जी.बी. शेलकीकर, प्रा. राजेंद्र खंडारे यांच्यासह रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष ऍड. आकाश हिवराळे यांचा सहभाग होता.

बैठकीच्या शेवटी डॉ. कल्याण साखरकर यांनी कुलगुरू डॉ. बारहाते,

प्र-कुलगुरू डॉ. ढोरे आणि सर्व उपस्थितांचे आभार मानून चर्चेचा समारोप केला.

Read also :https://ajinkyabharat.com/young-trainee-teacher/