अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात

एकाचा

एकाचा मृत्यू, 25 जखमी

अमरावती नागपूर महामार्गावर नागपूरहून अकोल्याच्या दिशेने

जाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात

Related News

एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातावेळी बसमधून जवळपास 35 प्रवासी प्रवास करत होते.

त्यावेळी एक गाय अचानक रस्त्यावर आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात

शिवशाही बस डायरेक्ट उलटली. त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, नागपूर- मुबंई महामार्ग एकाबाजूने बंद करण्यात आला आहे.

ही बस नागपूरहून अकोल्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी महामार्गावर

क्रमांक 6 वर एक गाय या बसच्या मध्ये आली. यावेळी गाईला पाहून

तिला वाचवण्याचा प्रयत्नात बस चालकाने एकदन जोरात ब्रेक लावला.

मात्र त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान गंभीर

दुखापतग्रस्त झाले नसल्याचे समजते. अपघातामुळे महामार्गावर मोठी

वाहतूक कोंडी झाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/sunita-williams-and-butch-wilmores-antaralaatla-mukkam-vadhala/

Related News