अमरावतीत जुन्या वादातून भरदिवसा हत्याकांड

 मुलासह आईची निर्दय हत्या, तिवसा शहर हादरले

अमरावती : तिवसा शहरात जुन्या वादातून एका भयानक हत्याकांडात आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने

संपूर्ण शहरात खळबळ पसरली आहे. अमोल वसंतराव डाखोरे (४०)

आणि त्याची आई सुशीला डाखोरे (५५) यांना दोन अज्ञात आरोपींनी

चाकूच्या सपासप वारांनी भरदिवसा घरासमोरच हल्ला करून ठार मारले.

अमोलचा ताबडतोब मृत्यू झाला,

तर सुशीलाला रुग्णालयात नेण्यात आले असता त्याचाही  मृत्यू झाला.

या हल्ल्यात अमोलचा दहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे

भरदिवसा घरासमोर झालेल्या या निर्घृण हत्येमुळे शहरातील लोक दचकले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून,

आरोपींना  शोधण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे.

प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या वैयक्तिक वादातून झाल्याचे समोर येत आहे.

पोलिस आरोपींना  लवकरात लवकर अटक करण्याच्या प्रयत्नात आहेत.

या घटनेने शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/akot-yehet-vi-shivaji-ganesh-utsav-mandalachi-edible-initiative-14-vy-35-banana-banana-donation/