अमरावती जिल्ह्यात TET परीक्षा सुरळीत; ८१४ उमेदवार अनुपस्थित

TET

पेपर १ ला ५५३०, तर पेपर 2 ला ८८५६ परीक्षार्थी उपस्थित

अमरावती जिल्ह्यात रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सुरळीतपणे पार पडली. जिल्ह्यातील एकूण ३६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

पेपर 1 साठी ५,८६५ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५,५३० परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. पेपर 2 साठी ९,३६५ नोंदणींपैकी ८,८५६ उमेदवारांनी परीक्षा दिली. दोन्ही सत्रांमध्ये एकूण ८१४ परीक्षार्थी विविध कारणांनी गैरहजर राहिल्याचे प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमॅट्रिक पडताळणी, स्क्रीनिंग आणि फेस रिकग्निशन प्रक्रिया राबवून परीक्षा पूर्णतः पारदर्शक ठेवण्यात आली.जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी दोन परीक्षा केंद्रांना भेट देऊन सर्व व्यवस्था तपासल्या. प्रशासनाच्या देखरेखीखाली परीक्षा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याची माहिती देण्यात आली.

read also : https://ajinkyabharat.com/50-students-in-akola-miss-the-tet-exam/