काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची चाकूने वार करून निर्घृण हत्या झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमटत असून, विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “हिदायत पटेल यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय मतभेदांचे रूप हिंसाचारात होणे हे लोकशाहीला शोभणारे नाही.” त्यांनी या प्रकरणात सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी केली.
या हत्येप्रकरणी काही राजकीय नेत्यांवर आरोप करण्यात येत असून, यावर प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “आरोप होणे आणि ते सिद्ध होणे हे दोन वेगळे टप्पे आहेत. केवळ आरोप झाल्याने कोणालाही दोषी ठरवता येत नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर आणि पुरावे समोर आल्यानंतरच दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
Related News
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात घडलेल्या एका थरारक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. भरदिवसा, गर्दीच्या ठिकाणी एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा चिरून...
Continue reading
नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून अशोक खरात याच्या संदर्भात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता थेट उच्चपदस्थ नेते, अधिकारी आणि मोठ्या ...
Continue reading
नाशिक: महिला अत्याचाराच्या गंभीर आरोपामुळे आधीच चर्चेत आलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरात यांच्या अडचणीत आता आणखी मोठी भर पडली आहे. नाशिक गु...
Continue reading
Dombivli Crime News : डोंबिवलीतील अपघातग्रस्त तरुणाची मदतीच्या बहाण्याने लूट; आरोपी सतीश कोरेला अटक, पोलिसांचा तपास सुरू.
Dombivli Crime N...
Continue reading
Ajit Pawar Plane Accident नंतर जय पवारांनी शेअर केले धक्कादायक व्हिडिओ, ज्यात VSR कंपनीचा मालक पायलट सीटवर झोपलेला दिसतो. DGCA ला तात...
Continue reading
FDA Corruption News मध्ये गुटखा कनेक्शन, आमदारांचे आरोप आणि मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचलेली तक्रार यामुळे राज्यात खळबळ. वाचा संपूर्ण ...
Continue reading
Gondia Baby Selling Case मध्ये 10 दिवसांच्या बाळाची विक्री, आरोपी डॉक्टरचा ब्लेडने आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांचा तपास वेगात. संपूर्ण ...
Continue reading
Pune ZP Election Results 2026: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जबरदस्त परफॉर्मन्स दिसून येत असून सत्तेच्या दिशेने वाटचाल सु...
Continue reading
Zilla Parishad Election Result 2026 मध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध निर्मला नवले यांचा कारेगाव गणातून पराभव झाला. भाजपच्या मनीषा पा...
Continue reading
अकोट :अकोट तालुक्यातील मोहाळा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक...
Continue reading
Ajit Pawar यांनी बारामती दौऱ्यात सांगितलेल्या 78 लाखांच्या भ्रष्टाचाराच्या किस्स्याने सभेत हास्यकल्लोळ उडाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, आघ...
Continue reading
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बद्रू जमा यांचे नाव या प्रकरणात पुढे आले असून, यावरही मिटकरी यांनी स्पष्ट केले की, “जर तपासात जिल्हाध्यक्ष दोषी आढळले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार कोणालाही पाठीशी घालणार नाहीत. पक्ष कोणत्याही गुन्हेगाराचे समर्थन करणार नाही.”
पोलीस तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत, “या घटनेचा तपास राजकीय दबावाशिवाय पार पडावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी यावेळी केली.
read also : https://ajinkyabharat.com/7-amazing-facts-sargasso-sea-the-worlds-only-amazing-sea/