केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन
अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले.
यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
“विरोधकांना हवं ते म्हणू द्या, तुम्ही चिंता करू नका. २०२९ मध्ये
पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल. मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही
असं म्हणणाऱ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की, मोदी सरकार पूर्ण ५ वर्षे टिकेल”
असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
“दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला.
काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे कामही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
तसेच देशातील जनतेने मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे.
भविष्यातही लोक त्यांच्या कामावर विश्वास ठेवतील”
असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
गृहमंत्र्यांच्या चंदीगड दौऱ्यादरम्यान पोलिसांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी
आशिष गजनवी यांना ताब्यात घेतलं होतं. गजनवी यांनी दिलेल्या माहितीनुसार,
सकाळी साडेसहा वाजता पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना सोबत येण्यास सांगितलं,
पण ते गेले नाहीत. यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यापासून रोखलं.
गजनवी आणि त्यांची टीम नेहमीच गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने करत आहे.
हे लक्षात घेऊन यावेळी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
मनीमाजरा पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन अमित शाह यांनी केलं.
यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
याचा फायदा परिसरातील एक लाखाहून अधिक लोकांना होणार आहे.
‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत, सतत उच्च दाब पुरवठ्याद्वारे पाण्याचा साठा कमी करून
अपव्यय रोखणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
याशिवाय अमित शाह यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/wrote-a-letter-to-rajnath-singh-demanding-to-stop-giving-arms-to-israel/