महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक
आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
झाली आहे. सध्या सर्वच पक्षाचे नेते अॅक्शन मो़डमध्ये आल्याचे
पाहायला मिळत आहे. त्यातच आता आगामी विधानसभा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन
दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आगामी
निवडणुकांबद्दल चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे.
त्यासोबतच ते लालबागचा राजाचे दर्शनही घेणार आहेत.
अमित शाह हे आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि
भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याचे बोललं जात आहे.
त्यासोबत अमित शाह हे जागा वाटपाबद्दलही चर्चा करणार आहेत.
त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. अमित शाह हे
आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहे. यानंतर ते
संध्याकाळी ७. ३० वाजता एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
यानंतर ९ सप्टेंबरला सोमवारी सकाळी १०.४५ वाजता अमित
शाहा हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे
दर्शन करण्यासाठी जाणार आहेत. यानंतर ११.१५ च्या सुमारास
अमित शाहा हे एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या
दर्शनासाठी जातील. त्यानंतर अमित शाह हे दुपारी १२.१०
मिनिटांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. तसेच १२.५०
मिनिटांनी अमित शाह हे आशिष शेलार यांच्या वांद्र्यातील
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील, असे अमित शाह
यांच्या दौऱ्याचे नियोजन आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/paralympics-2024-concludes-today/